Important Points for Buying Android Phone (अँड्रॉईड फोन खरेदी करताना..)

 
हल्ली बाजारामध्ये अँड्रॉईड फोन्सची खूप चलती आहे. साडेतीन ते चार हजारापासून अगदी पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत अँड्रॉईड फोन्स उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार कुठला फोन घ्यायचा ते ठरवते. पण अँड्रॉईड फोन्स विकत घेण्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. हे मुद्दे एकदा नीट तपासून मगच अँड्रॉईड फोनची निवड केली तर चांगले.

१) आफ्टर सेल्स् सर्व्हिस- After sales service  हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम हा मुद्दा नीट पडताळून पाहणे गरजेचे आहे. एखादा फोन घेऊन झाल्यावर समजा त्यात बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटर्स कुठे कुठे आहेत हे आधीच बघायला हवे. जर सर्व्हिस सेंटरच नसेल असेल तर नवीन फोनवर वर्षाची वॉरेंटी असूनही काय फायदा? त्यामुळे त्या फोन कंपनीच्या सर्व्हिस सेंटर्सची नीट माहिती करून घेणे आवश्यक आहे.

२) यूजर रिव्ह्यूज (user reviews) - एखाद्या अँड्रॉईड फोनची जाहिरात बघून हाच फोन मला हवाय- हाच आता माझ्या मनात भरलाय असं मुळीच करू नये. इंटरनेटवर हल्ली खूप वेबसाईटस् आहेत जेथे ग्राहक/यूजर्स एखादा मोबाईल कसा वाटला त्याबद्दल आपले मत सांगतात, त्यांना आलेले अनुभव सांगतात. हे अनुभव वाचणे खूप गरजेचे आहे. ह्या अनुभवांवरून फोन दीर्घकाळ चालेल किंवा नाही ते समजते. ह्या वेबसाईट्स खूप फायदेशीर ठरतात. ह्यातील माहिती नक्कीच वाचावी. गुगलमध्ये जाऊन यूजर रिव्ह्यूज अगदी सहज शोधता येऊ शकतात.

http://www.gsmarena.com


३) स्पेअर पार्टस्- spare parts ची उपलब्धता हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुमचा फोन हातातून पडला आणि त्याची काच फुटली/डिस्प्ले खराब झाला. तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये गेलात आणि तुम्हाला सांगण्यात आले की डिस्प्ले रिपेअर व्हायला १५ ते २० दिवस लागतील. असे होता कामा नये. डिस्प्ले, कॅमेरा, मदरबोर्ड ते महत्त्वाचे पार्टस् आहेत आणि ते वेळेवर मिळणे गरजेचे आहे. नाहीतर फोन वापरता येणार नाही. इथेसुद्धा यूजर रिव्ह्यूज कामाला येतात. सर्व्हिस सेंटरला आलेले अनुभव यूजर्स लिहितात तेसुद्धा वाचणे गरजेचे आले.


४) अँड्रॉईड फोन मेमरी- मेमरी (इंटरर्नल, एस.डी.कार्ड) हा एक असा मुद्दा आहे की ज्यात बर्‍याच ग्राहकांचा गोंधळ उडतो. अँड्रॉईड फोन्सच्या जाहिरातीत अमुकअमुक जी.बी. इंटरनल मेमरी आहे असे लिहिले जाते पण बर्‍याच अँड्रॉईड फोन्समध्ये इंटरर्नल मेमरीमधील काही जी.बी. मेमरी सिस्टिम रीजर्व्हड् (reserved) असते आणि बाकीची बाकीची आपला डाटा सेव्ह करण्यासाठी. जर तुमची गरज 8 जी.बी.ची असेल तर 12 ते 16 जी.बी. इंटरर्नल मेमरी असलेला फोन घ्यावा. म्हणजे सिस्टिम रिझर्व्हड् मेमरी सोडून मुबलक प्रमाणात तुमचा डाटा सेव्ह करण्यासाठी मेमरी उपलब्ध राहिल. मेमरीचे तीन प्रकार आहेत...

१) रोम (ROM) मेमरी
२) इंटरर्नल एस्.डी.कार्ड (इंटरनल मेमरी)
३) एक्स्टर्नल एस्. डी. कार्ड (external S.D. card) 

बर्‍याच अँड्रॉईड फोन्समध्ये ऍपस् (apps) म्हणजेच ऍप्लिकेशन्स् इन्स्टॉल होतात ती रोम मेमरीमध्ये. उदाहरणार्थ- एखाद्या फोनची तुम्ही जाहिरात बघितली ज्यात असे सांगितले होते की फोनमध्ये 16 जी.बी. इंटरर्नल मेमरी आहे आणि 32 जी.बी. पर्यंत external S.D. card तुम्ही टाकू शकता. फोन तुम्ही विकत घेता आणि नंतर समजते की apps इन्स्टॉल होत आहेत ती रोम मेमरीमध्ये जी 2 जीबीचीच आहे. म्हणजे जरी फोनमध्ये 2+16=18 जी.बी. मेमरी आहे तरी ऍप्स् 2 जी.बी.मध्येच install होत आहेत. मूव्ह टू एस.डी. कार्ड हे ऑप्शन प्रत्येक ऍपसाठी वापरता येत नाही आणि ज्या ऍप्ससाठी ते वापरता येते त्याने ती ऍप्स पूर्णपणे S.D. card वर मूव्ह होत नाहीत. त्याचा काही भाग रोम मेमरीमध्ये राहतो. त्यामुळे फोन घेताना ऍप्स् इंटरर्नल मेमरीमध्ये जातील असा फोन घ्यावा. इंटरर्नल मेमरीसुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध हवी. 



हल्ली जिथे अँड्रॉईड फोन विकत घ्यायला जातो त्या दुकानात डेमोसाठी फोन्स उपलब्ध असतात. त्या फोन्सवर आपण हा मुद्दा खालीलप्रमाणे पडताळून पाहू शकता.

 फोन सेटिंग्ज्--> ऍप्लिकेशन मॅनेजर-->डाऊनलोडेड

डाऊनलोडेडमध्ये तळाला ऍप्सनी किती मेमरी वापरली आहे आणि किती रिकामी आहे ते कळते. त्यावरून ऍप्स कुठे इन्स्टॉल होत आहेत त्याचा अंदाज घ्यावा. हा मुद्दा ध्यानात न घेता फोन घेतला जर अगदी थोड्याच काळात मेमरी कमी पडत असल्याने नवीन फोन घ्यायची वेळ येऊ शकते.

५) कॅमेरा- लोकांचा असा चुकीचा समज आहे की जितके मेगा पिक्सेल जास्त तितका कॅमेरा चांगला आणि त्यातून जास्त छान फोटो/व्हिडिओज् येऊ शकतात. कॅमेराची लेन्ससुद्धा खूप महत्त्वाची आहे. 8 मेगा पिक्सेल कॅमेरा पण लेन्स साधी , 5 मेगा पिक्सेल कॅमेरा पण लेन्स खूप चांगल्या प्रतीची अशा दोन अँड्रॉईड फोन्समधून फोटो काढून बघावेत. बर्‍याचवेळा असे ध्यानात येईल की 5 मेगा पिक्सेलच्या कॅमेर्‍यातून जास्त छान फोटो येत आहेत. यूजर रिव्ह्यूज इथे महत्त्वाचे ठरतात. फोनला पुढे आणि पाठी असे दोन कॅमेरा असलेले केव्हाही चांगले कारण पुढचा कॅमेरा वापरून व्हिडिओ कॉलिंग करता येते. (पुढचा कॅमेरा हा नेहमी पाठच्या कॅमेर्‍यापेक्षा कमी मेगा पिक्सेलचाच असतो.)

६) प्रोसेसर- हल्ली फोन्स ड्युअल कोअर, क्वाड कोअर प्रोसेसरचे येतात. क्वाड कोअर प्रोसेसर ड्युअलपेक्षा फास्ट म्हणून तोच फोन घ्यावा हा अजून एक चुकीचा समज. फ्रिक्वेन्सी जी हर्ट्झ् (Hz) मध्ये मोजली जाते तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. 1 गीगा हर्ट्झ् (GHz) क्वाड कोअर आणि 2 गीगा हर्टझ् ड्युअल कोअर जवळपास सारखाच परफॉर्मन्स देतात हे ध्यानात घ्यावे. त्यामुळे कोअरबरोबर फ्रिक्वेन्सी महत्त्वाची आहे हे ध्यानात घ्यावे.


अँड्रॉईड फोन्सची परफॉर्मन्स टेस्ट घेण्याचे अजून एक खूप महत्त्वाचे माध्यम म्हणजे  अंटुटु बेंचमार्क’  (Antutu Benchmark) ह्या वेबसाईटवर बरेच फोन्स टेस्ट केले जातात. ह्यात 2-D टेस्ट, 3-D टेस्ट, प्रोसेसर टेस्ट, रॅम टेस्ट, मल्टिटास्किंग (एकाच वेळी एकाहून अधिक काम करणे) टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर फोनला विशिष्ट गुण दिले जातात आणि सगळ्या टेस्टचे एकूण गुणसुद्धा दिले जातात. ह्यावरून फोन्सच्या परफॉर्मन्सचा अंदाज येतो. फोन घेताना कुठला फोन घेऊ असा गोंधळ होत असेल तर  Antutu चा टेस्ट अहवाल नक्कीच बघावा. त्यामुळे फोनची निवड करणे सोप्पं जाईल.

Important Points for Buying Android Phone (अँड्रॉईड फोन खरेदी करताना..) Important Points for Buying Android Phone (अँड्रॉईड फोन खरेदी करताना..) Reviewed by Nikhil Bhalwankar on November 10, 2016 Rating: 5

No comments:


Powered by Blogger.